मराठी भाषा संबंधाने लेख संकलन व चर्चात्मक समुदाय

मराठी शुद्ध लेखनासंदर्भाने जमविलेले ज्ञान वा लेखन संदर्भ या ठीकाणी सुचविले गेल्यास सर्व लेखक वाचक समुदायास त्याचा खुप फायदा होईल व भाषा वृद्धीकरणास नक्कीच चालना मिळेल.

आपल्या प्रत्येकाच्या वाचनात भाषेसंदर्भाने सतत काही ना काही लिखाण येत असते. जसे आज दिनांक १३ जुलै २०२५ रविवार रोजी लोकसत्ता वर्तमान पत्राच्या लोकरंग पुरवणीत ’ मराठी भाषेची राखण आणि संगोपनाचा ग्रंथयज्ञ हा वीणा गवाणकर लिखित लेख प्रकाशित झाला आहे.

भाषातज्ञ श्री सुहास अनंत रानडे यांच्या मराठी समानार्थ लघु शब्दकोश आणि इतर बरंच काही ’ खंड १ , प्राणि जगत प्रकरण १ ( अ ) चतुष्पाद (जरायुज - सस्तन - भूचर ) पशू ’ ह्या परममित्र प्रकाशनाकडून प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे विवेचन केले आहे . सदर खंडातच नियोजित ३९ खंडांचे सुतोवाच केले आहे .

मराठी भाषा संबंधाने वाचक -लेखक सुरपाखरांना ह्या संकलनाचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा वाटते .

1 Like

ही माहिती इथे संकलित केल्याबद्दल अनेक आभार. आपले या समुदायात स्वागत आहे.