पै. गणेश मानगुडे लिखित बाजिंद कादंबरी

सध्या पहेलवार गणेश मानगुडे लिखित बाजिंद कादंबरी वाचतोय. मला बहिर्जी नाईक यांच्या संदर्भात अधिक माहिती हवी होती आणि त्यांचे काही संदर्भ या कादंबरीमधे आहेत असे कळले म्हणून उत्सुकता म्हणून ही कादंबरी वाचायला घेतली.

ही कादंबरी पूर्णतः काल्पनिक आहे असे आधीच लेखकाने नमूद केलेले आहे तरीही यातले संदर्भ ऐतिहासिक आणि पात्रे शिवकालीन आहेत, त्यामुळे गडांची नावे शिवाजी महाराजांच्या इतिहासातले काही प्रसंग आणि ऐतिहासिक व्यक्तींचा उल्लेख या कादंबरीत येतो.

कोरा डॉट कॉम संकेत स्थळावर एक उत्तरात या कादंबरीची काही पाने टाकून असे म्हणण्यात आले की मोसाद मधे बहिर्जी नाईक यांचेवर धडे शिकवतात त्याचे प्रमाण म्हणून हे लिखाण बघा. ते वाचल्यावर ही कादंबरी वाचण्याची माजी उत्सुकता वाढली. वाचल्यावर मी म्हणेन की कादंबरीचे विवरण असे काही प्रमाणित करते असे मला वाटत नाही कारण या कादंबरीमधे कोणतेच ऐतिहासिक संदर्भ लेखकाने दिलेले नाहीत.

यातली पात्रे शिवकालीन आहेत तरीही त्यांच्या संभाषणात मला अख्या महाराष्टातून पेहेलवान आलेत, किंवा संपूर्ण महाराष्टात फिरलो पण असे लिहिलेले दिसले, आणि प्रश्न पडला की त्या काळात महाराष्ट्र हे भौगोलिक राज्य अस्तित्वात नसताना असे शब्द त्या पात्रांच्या संवादात वाचताना खटकते.

माझी अजून अर्धिच वाचून झालीय, संपूर्ण वाचणे झाले की इथे परत अहवाल लिहेन.