नागपुरात “वाचू आनंदे” नावाने एक घरपोच वाचनालय आहे त्याची माहिती त्यांच्याच माहिती पत्रकातून इथे सादर करतोय.
मन असो की सदन, वाचनासारखा उत्तम संस्कार नाही. आपल्या सगळ्यांचे मन लहानपणी झालेल्या वाचनाने समृद्ध झालेले आहे; पण पुढे वाढत्या प्रापंचिक आणि व्यावसायिक व्यापामुळे वाचनाशी संबंध सुटतो. वाचनालयात नियमित जाऊन पुस्तके आणणे जमत नाही. इच्छा असूनही पुस्तक विकत घेणे साधत नाही. शिवाय काय वाचावे? हा देखील संभ्रम असतो. यावर उपाय म्हणून हा अभिनव उपक्रम माहित असायलाच हवा.
वाचू आनंदे
उत्तम वाचकांनी अतिशय चोखंदळपणे निवडलेली ललित आणि वैचारिक, नामवंत लेखकांची, आपण वाचलीच पाहिजेत अशी, निवडक दर्जेदार पुस्तके घरपोच वाचनालयातून आपल्यापर्यंत अतिशय माफक सेवा शुल्कात पोहिचवले जातात.
या योजनेत महिन्याला किमान चार दर्जेदार पुस्तके आपल्याला घरबसल्या वाचायला मिळतील.
संपर्क:
सौ. अश्विनी अडोणी
संचालक, ‘वाचू आनंदे’
8600141648
