मॉड्यूलर किचन!
20 व्या शतकाच्या शेवटी शेवटी भारतीय जनसामान्यांच्या घरात मॉड्यूलर किचनचं प्रस्थ वाढलं. त्यापूर्वी लाकडी दारं असलेली कपाटं, ओट्याखालची जाळीची दारं असलेली कपाटं.
काही घरांमधे भिंतीत लाकडी फळ्या लावून केलेल्या उघड्या आलमाऱ्या, त्या फळ्यांवर समाचार पत्रं अंथरून त्यावर पालथे भांडे, डबे एका ओळीत… आधी मोठे मग त्याहून लहान असे लावायची प्रथा होती.
मग दर महिन्यात अंथरलेले पेपर बदलणे, डबे स्वच्छ घासून घेणे अशी कामं असायची. त्या काळात पेस्ट्स ला कंट्रोल करणं जास्त त्रासदायक होतं. पण घरातील बायका स्वयंपाकघर अगदी स्वच्छ ठेवत असत. त्या पूर्वी तर डायनिंग टेबल पण नव्हते खाली बसून जेवणं असायची. जेवणं झाल्यावर उष्टी उचलणं, जमीन पुसून घेणं ही कामं असायची.
आता मॉड्यूलर किचन मुळे स्वयंपाक करणं आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणं खूप सोयीचं झालं आहे. शिवाय झुरळांचा, उंदरांचा बंदोबस्त करायला इतके छान कारगर उपाय आलेत की ते उपाय (पेस्टकंट्रोल) केल्यावर ही त्रासदायक जनता तडीपार होते. फक्त एक आहे की ह्यांची संख्या वाढायच्या आतच ह्यांना कंट्रोल करायला हवं. तसेच पाश्चिमात्य देशांचं अनुकरण न करता मॉड्यूलर किचनच्या ट्रॉलीज़ मधे भांडी सरळ न ठेवता पालथीच घालावी. भांडी स्वच्छ राहतात. मी बऱ्याच लोकांकडे बघितलं त्यांना वाटतं मॉड्यूलर किचन आहे तर भांडी उघडी, सरळच लावायची. हा काही नियम थोडाच आहे. आपण आपलं लॉजिक लावावं. भांडी उघडी लावल्याने त्यात पाणी तळाला साचलेलं राहातं, ओल राहिल्याने झुरळांना मोकळीक मिळते… इथल्या वातावरणा प्रमाणे इथलेच नियम लागू करावे. आपल्या पूर्वजांनी बऱ्याच अनुभवानंतरच काही नियम तयार केले होते.
असो.
हे मात्र नक्की आहे की स्वयंपाक घर जुनं असो की नवीन… पेस्ट्स वर कंट्रोल असला तर अन्न, स्वच्छ, सुंदर, सात्विक आणि पौष्टिक तयार होतं. नाही तर सगळं घर आजारी व्हायला वेळ लागत नाही.
सई देशपांडे
27.07.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026
