मूळ प्रकाशन: कोटकायन भाग – ०२ - सुरपाखरू साहित्य
बाहेर जाऊन क्रेडिट कार्ड मार्केटिंग करणाऱ्या २० पेक्षा जास्त विक्री प्रतिनिधींची रोज सकाळी १० ला मिटिंग होत. तसे जे काही दिवसांनी फक्त टेलिमार्केटिंगसाठी आमच्याकडे आलेले होते, त्यांचाही एवढाच स्टाफ होता. रोजचे टार्गेट, साप्ताहिक आणि मासिक टार्गेट हे विक्री प्रतिनिधींना दिल्या जात असे. तेव्हा लक्षात आले मार्केटिंग जेवढे सोपे वाटते तेवढे नाही. पण मेहनत घेतल्यास, प्रॉडक्ट चा व्यवस्थित अभ्यास केल्यास, चांगली मार्केटिंग स्किल अंगी असल्यास हे शक्य आहे. हे कोटकमधील विक्री प्रतिनिधींकडून लक्षात आले. कारण त्यांचे जे मूळ वेतन असते त्यापेक्षा जास्त पैसे ते विक्री केलेल्या प्रॉडक्टवर मिळणाऱ्या इन्सेन्टिव्ह मधून कमावतात. त्यामध्येही अटी आणि शर्ती लागू असतात त्या वेगळ्याच.
जर कुणी टार्गेट पूर्ण केले किंवा त्यापेक्षा जास्त काही विशेष केले तर त्याला पुरस्कार, विशेष कौतुक आणि त्यानेच जर पुढच्या वेळेस याउलट केले तर त्याच्यावर आरडाओरड आणि शिव्यांची बरसात. जर कुणी पुन्हा पुन्हा दिलेले टार्गेट पूर्ण करण्यात अपयशी ठरत असेल तर,
तुमसे नहीं जम रहा तो पेपर डालो और निकलो यहाँ से।
अगर वो भी नहीं जमता तो टर्मिनेशन के लिए तैयार रहो। हे सर्व अत्यंत कठोर आणि ओरडून विक्री व्यवस्थापक सांगत असे.
एकंदरीत Sales मधे एकीकडे विक्री व्यवस्थापक विक्री प्रतिनिधींवर टार्गेट साठी दबाव बनवतात, तर विक्री व्यवस्थापकावर त्याच्या वरचे बॉस दबाव बनवत असतात. ज्यांची अफाट मेहनत, स्मार्ट वर्क करण्याची तयारी आणि सोबतच शिव्या आणि ओरडा खाण्याची तयारी असते ते यात यशस्वी होतात हे ही खरे.