टॉकीज़ ते मल्टीप्लेक्स!
‘अरे पाण्याची बॉटल तर विसरलेच ठेवायला’ म्हणून मी फ्रिज कडे वळले तसं मुलांने मला थांबवलं, ‘आई, तिथे सोबत काहीच नेता येणार नाही. तिथलंच विकत घ्यावं लागेल’…
ही आमची एटरनिटी मॉल, बर्डी ला मूव्ही बघायला जायची पहिलीच वेळ होती. नवीनच सुरू झाला होता मॉल. त्यानंतर बऱ्याच मूव्हीज़ बघितल्या तिथे आणि इतरही मल्टीप्लेक्सेस मधे. आता ह्या नवीन प्रकाराची चांगलीच सवय झाली आहे.
AC थिएटर्स, रिक्लायनिंंग सीट्स, बकेट भर पॉपकॉर्न, कधी कधी फूड तेच सीट वर आणून देतात, असं अतिशय कंफर्टेबल दृश्य आहे आता थिएटर्सचं.
कधी कधी जुने, लहानपणी मूव्ही बघायला जायचो ते थिएटर्स खूप आठवतात.
त्या काळी थिएटर्स ला टॉकीज़ म्हणायचो. सरोज टॉकीज़ ला आम्ही बरेचदा जायचो. 'मूव्ही’ला पण ‘पिक्चर’ म्हणायचो. किती गोड दिवस आणि साधी माणसं होती.
तिकिट काढलं की सरळ बालकनी च्या पायऱ्या होत्या. आता आधी तर मॉल्स चे फ्लोर्स चढावे लागतात अर्थात त्या साठी एस्केलेटर्स किंवा लिफ्ट असतात पण तिथपर्यंत तर चालावच लागतं.
टॉकीज मधे कुणी तरी मोठी व्यक्ती इंटरवल मधे बाहेर जाऊन पॉपकॉर्नचे 5 रू चे पाकिटं, किंवा खाऱ्या दाण्याचे पेपरचे कोन्स प्रत्येकासाठी घेऊन येत असत. बरेचदा तर ते इंटरवल संपेस्तोर फस्त झालेले असायचे. आता आपल्याला काही नेता येत नाही आणि तिथल्याच पॉपकॉर्नच्या भल्या मोठ्या बकेट्स घ्याव्या लागतात. सोबत जास्त लोकं असतील तर बरं, लवकर संपतात पण दोघं तिघंच असतील तर लवकर संपत नाही आणि मूव्ही सुरू असताना पॉपकॉर्न खाण्याचा आवाज आजूबाजूला येत तर नाही ह्याची काळजी घ्यावी लागते. स्पेशली एखादा दुःखी सीन सुरू असेल तेव्हां तर फारच मोठा प्रश्न पडतो. अश्या वेळी पॉपकॉर्नची बकेट संपवणं म्हणजे तारेवरची कसरतच वाटते.
त्याकाळी एक अजून प्रकार होता तो म्हणजे
ग्रांउड फ्लोरला रिझर्व्ह, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास असं विभागलेलं असायचं.
थर्ड क्लास म्हणजे स्क्रीनच्या अगदी समोर च्या रांगा. डोकं वर करूनच मूव्ही बघावी लागायची.
त्याकाळी मुलांकडे इतके पैसे राहत नव्हते. पॉकेट मनी वगैरे प्रकारच नव्हता. माझे यजमान सांगतात ते आणि त्यांचे मित्र थर्डक्लासचं तिकिट काढायचे आणि मागच्या सीट्स रिकाम्या दिसल्या की मागे जाऊन बसायचे. मुलं अश्या युक्त्या काढायचे. जशी सोय असेल त्यात खुष असायचे मुलं. त्यामुळे डिप्रेशन वगैरे प्रकारच नव्हता. काहींनी तर हे पण सांगितलं की एखादं आवडीचं गाणं लागलं की लोकं स्क्रीनवर चिल्लर पैसे (कॉइन्स) फेकायचे.
काही छोट्या शहरांमधे तर सीट्स मधे ढेकणं असलेली पण आठवतात. आता तर मुलांना ढेकणं म्हणजे काय हेच माहीत नाही. अजून एक आठवतं काही टॉकीज़ मधे सिगारेटचा भयानक वास असायचा ज्याचा मला फार त्रास व्हायचा. आता तो वास अजीबात नसतो त्यामुळे मी खूप एन्जॉय करते.
नुकतेच धुरंधर 1 आणि धुरंधर 2 मला थिएटर मधेच बघायची इच्छा होती! मुलांनी माझी इच्छा पूर्ण केली. मुलगी धुरंधर 1 आणि मुलगा धुरधंर 2 बघायला घेऊन गेले. टॉकीज़ च्या आठवणी जरी येत असल्या तरी मल्टिप्लेक्सेज़ मला जास्त आवडतात. खूपच कंफर्टेबल असतात आणि वाटतं ‘मेरा भारत बदल रहा है’!
फोटोत सरोज टॉकीज चं नंतर नाव सुदामा झालं त्याचा फोटो आहे. आता तर हे पण पाडून नवं कंस्ट्रक्शन सुरू आहे. बहुदा मॉल आणि त्यात मल्टिप्लेक्स असं राहील.
सई देशपांडे
09.07.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026
