मूळ प्रकाशन: सुरपाखरू(मानसिकता)जून २०२६ - सुरपाखरू साहित्य
मानसिकता (लघुकथा)
जेवता जेवता अचानक सारिका उठली. सारंगच्या मावशीने तिला विचारलं ,
” काय झालं मुली तू अचानक जेवण सोडून का उठली? तुझी तब्येत तर ठीक आहे ना ? तुला जेवण आवडलं नाही का ? दूसरं काही बनवू का?”सारिका कसनुसं हसत म्हणाली ,”नाही न..नको मला जास्त भूक नाही .जेवण चांगलं आहे.”अस म्हणत तिने थोडं रागानेच सारंगकडे
पाहिलं. सारिकाच्या चेह-यावरची अस्वस्थता सारंगच्या नजरेनं टिपली होती.सारिका एक डॉक्टर होती .सारंग तिच्या हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टर होता.अचानक इमर्जन्सी आल्याने त्या दोघांना एका छोट्याशा गावात यावं लागलं .त्याच गावात त्याची आत्या रहात होती.जातीनं ठाकूर असल्याने गावात तिच्या कुटुंबाला बराच मान होता.
गावातील रोगी पहाता पहाता बराच वेळ झाला होता .सारंगने सारिकाला आत्याकडे जायचं का म्हणून विचारलं.सारिकाला संकोच वाटत होता. ती सारंगला म्हणाली ,” नको रे तू जाऊन ये. मी इकडेच कुठेतरी धाब्यावर जेऊन घेईन शिवाय आपल्याबरोबर ड्रायव्हर पण आहे.उगाच आत्याला कशाला त्रास?”
पण सारंगने तिला खूप आग्रह केला .खरंतर
तिलाही खूप भूक लागली होती .मग तिनंही जास्त आढेवेढे घेतले नाही. गावाबाहेर जरा एकाट रस्त्यावरच आत्यांचा बंगला होता.सारंगने चौकीदारला सांगून गाडी आत घेतली . चौकीदारने आत निरोप पाठवला तसे आत्या आणि आत्योबा दोघंही बाहेर आले.सारंगला पाहताच आत्याला आनंद झाला.त्याने आत्या आत्योबांना वाकून नमस्कार केला.सारिकानेही हात जोडून नमस्कार केला.ते दोघंही आत दिवाणखान्यात गेले. दिवाणखाना चांगला प्रशस्त असून अनेक किंमती वस्तूंनी सजलेला होता.जमीनीवर अंथरलेला कश्मीरी गालिचा उच्च अभिरूची ची जाणीव करून देत होता.सारिकाला खूप संकोच वाटत होता.आत्याचंच घर असल्याने सारंग मात्र रिलॅक्स होता.त्यांच्या बरोबर आलेल्या ड्राईव्हरला मात्र चौकीदारने आत जाऊ दिलं नव्हतं. सारिकाच्या चाणाक्ष नजरेतून ही गोष्ट सुटली नाही.सारंगने आधीच फोन केल्यामुळे जेवणाची तयारी झाली होती.दोघंही जेवायला बसले.सारिकाने ड्रायव्हरला पण बोलावू का असं विचारल्यावर मात्र सारंग काहीच बोलला नाही. आत्याने त्याला इशा-याने आत बोलावलं.
आत्याचा हळू आवाज सारिकाच्या कानावर पडला .” तुला तर माहित आहे ना खालच्या जातीच्या लोकांना आपल्याकडं प्रवेश
नाही मग तू त्याला बंगल्याच्या आत कशाला आणलसं?बरं मी नोकराच्या हाती त्याचं जेवण पाठवते .जेवल्यानंतर त्याला थाळी धुवून बाहेरच ठेवायला सांग.”सारंग पडलेल्या चेह-यानं बाहेर आला.त्याच्या पाठोपाठ नोकराच्या हाती एल्युमिनीयमच्या थाळीत आत्यांनी बाहेर जेवण पाठवलं.सारिकाच्या मनात सर्व पाहून उद्वेग दाटून आला.अजूनही ही मानसिकता .मग आपण तर…!
सौ ऐश्वर्या डगांवकर.पुणे
भ्रमणध्वनी- 9329736675.