परिचय
◆ कवी, गझलकार, गीतकार, समिक्षक -
विजो (विजय जोशी).
टोपण नाव - “विजो”.
“काव्यगुरू” या उपाधीने सन्मानित.
गेली जवळपास २५ वर्षे साहित्य क्षेत्रात सक्रियतेने कार्यरत.
भ्रमणध्वनी : ९८९२७५२२४२
इ.मेल : vijayjoshi20@hotmail.com
◆ वृत्तबद्ध कविता, गझल, बालकविता आणि मालवणी बोलीभाषेतील कविता साहित्य लेखन.
◆ शिक्षण : बी.कॉम, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, एम.बी.ए. (मार्केटिंग मॅनेजमेंट).
◆ नोकरी : हायमिडीया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई येथे निर्यात व्यवस्थापक या पदावर कार्यरत.
◆ आई या एकाच आशयावर विविध २५ वृत्तांमध्ये लिहिलेल्या काव्यपंक्ती / लक्षणपंक्ति या ‘वृत्ताई’ उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया या संस्थेकडून जागतिक विक्रमाची नोंद.
◆ कवी विजो यांच्या ‘बाया’ या मराठी कवितेचा विविध ५६ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. हा एक जागतिक विक्रम आहे. आणि याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया या संस्थेकडून घेतली गेली आहे.
◆ पदभार आणि सभासद संस्था :
ओंजळीतील शब्दफुले साहित्यिक समूह (संस्थापक सदस्य).
काव्यप्रेमी गझल मंच राज्यस्तरीय (अध्यक्ष).
पेंढरकर कॉलेज, डोंबिवली (स्वायत्त) संस्थेच्या अभ्यास मंडळावर साहित्यिक प्रतिनिधी म्हणून कार्यरत.
काव्य रसिक मंडळ, डोंबिवली (माजी अध्यक्ष).
काव्यप्रेमी शिक्षक मंच ® सिंधुदुर्ग जिल्हा (माजी अध्यक्ष)
कोकण मराठी साहित्य परिषद (डोंबिवली शाखा).
महाराष्ट साहित्य परिषद, पुणे (डोंबिवली शाखा) - कार्यकारिणी सदस्य.
मुंबई मराठी साहित्य संघ (आजीव सभासद)
विश्व मराठी परिषद (मानद आजीव सभासद).
◆ उपक्रम :
“ओंजळीतील शब्दफुले” या उपक्रमा द्वारे विविध ठिकाणी स्वरचित कवितांचे कार्यक्रम सुरू (आजवर ६५ प्रयोग संपन्न).
“ओंजळीतील शब्दफुले” या साहित्यिक समूहातर्फे विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन.
वृत्त आणि गझल मार्गदर्शन कार्यशाळेचे विविध ठिकाणी आयोजन (आजवर ६० कार्यशाळा संपन्न).
“संवाद कवितेशी - संवाद रसिकांशी” आणि “अंतःस्थ मनातील कविता” हे कवितेशी संबंधीत मुलाखत, माहिती, कविता, गप्पा अशा स्वरुपाचे कार्यक्रम सुरू.
प्रकाशित साहित्याचे समीक्षण करणे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने, बहुभाषिक साहित्य संमेलने, Poetree Carnivals, परिसंवाद अशा विविध ठिकाणी निमंत्रित म्हणून सहभाग.
‘तिमिरातुनि तेजाकडे’ या संगीत अल्बमसाठी गीतलेखन.
'सप्तसूर म्युझिक ’ या संगीत अल्बमसाठी गीतलेखन.
विविध काव्यस्पर्धा आणि साहित्यिक कार्यक्रमात सन्मानित अतिथी, परिक्षक म्हणून निमंत्रित.
विविध वर्तमानपत्रे, मासिके, दिवाळी अंक, साहित्यिक प्रकाशने यांमध्ये अनेक कविता साहित्य प्रकाशित.
आकाशवाणी मुंबई वरून कवितांचे प्रसारण.
◆ पुरस्कार :
दापोली येथील शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती® आयोजित मुंबई येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
काव्यांगण प्रतिष्ठान, यवतमाळ राज्यस्तरीय कवी सम्मेलनात मुख्य अतिथी म्हणून सन्मानित.
नाशिक येथिल ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सन्मानित.
“वृत्त आणि गझल कार्यशाळा” आणि कविता साहित्यातील इतर उपक्रमांची दखल घेऊन नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्ष मा.गझलकार कै.श्री.मधुसुदन नानिवडेकर यांच्या कडून “काव्यगुरू” ही उपाधी प्रदान.
काव्यप्रेमी शिक्षक मंच® पुरस्कृत “प्रेरणा पुरस्कार” - २०२२.
महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे या संस्थेचा महाकवी कालिदास काव्य पुरस्कार - २०२२.
तितिक्षा मंदाश्री काव्यगौरव पुरस्कार - २०२३.
शुभंकरोति गुणगौरव पुरस्कार - २०२५.
तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्का - २०२५ (सांगली).
श्रि दा काव्यकोहिनूर पुरस्कार - २०२५
मैत्रा फाऊंडेशन काव्य पुरस्कार २०२२.
अक्षरमंच प्रतिष्ठानचा २०२१ चा अक्षरगंध पुरस्कार (कवितासंग्रह - अंतःस्थ मनात).
संकेत प्रकाशन, अकोला या संस्थेचा सर्वोत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार २०२१ (कवितासंग्रह - अंत:स्थ मनात).
‘कवितेचे घर’ पुरस्कृत बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय बालसाहित्य प्रथम पुरस्कार - २०२४ (टोपीवाले फुगे - बालकवितासंग्रह).
अक्षरसागर साहित्य मंच, गारगोटी राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार - २०२४ (टोपीवाले फुगे - बालकवितासंग्रह).
ऍग्रोन्यूज परिवार चॅरीटेबल ट्रस्टचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा प्रथम पुरस्कार - २०२४ (टोपीवाले फुगे - बालकवितासंग्रह).
काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित शंकर घोरसे सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार - २०२४ (टोपीवाले फुगे)
अंकुर साहित्य संघ बालसाहित्य पुरस्कार - २०२४ (टोपीवाले फुगे).
तितिक्षा इंटरनॅशनल पुणे पुरस्कृत तितिक्षा सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार - २०२५ (टोपीवाले फुगे).
स्व.बाबासाहेब के. नारखेडे स्मृती राज्य पुरस्कार - २०२५ भुसावळ (टोपीवाले फुगे).
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी (चंद्रपूर) यांचा ‘आनंदाचे झाड’ - सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार - २०२५
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर वाङ्मय पुरस्कार - २०२५ चिपळूण (वृत्तबद्ध कविता ते गझल - तंत्र आणि मंत्र).
संत नामदेव राष्ट्रीय काव्य साहित्य पुरस्कार,
संत नामदेव राष्ट्रीय काव्य पुरस्कार - २०२१ (कवितासंग्रह - अंतःस्थ मनात)
कविता साहित्याची दखल घेऊन प्रितगंध फौंडेशन - मुंबई कडून साहित्यिक पुरस्कार.
कवयित्री शेवंताबाई सरकाटे स्मृती राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार (कविता संग्रह - ओंजळ).
अमृतादित्य साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार (कविता संग्रह - मनतरंग).
साहित्य सेवा गौरव पुरस्कार (लेखन अन् मी साहित्य संस्था - कोल्हापूर) - २०२४.
कै.सौ.कुमूदिनी गडकरी पुरस्कार.
कै.वैजयंती काळे पुरस्कार.
हृदयांतर ब्लॉग आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा पुरस्कार.
अस्मिता ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा लक्षवेधी पुरस्कार.
राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार (पारस काव्य, कला, जनजागृती संस्था - नवी मुंबई)
कै.म.पां.भावे स्मृती उल्लेखनीय पुरस्कार.
“अक्षय-रजनी” राज्यस्तरीय काव्य पुरस्कार.
अशा साहित्यातील अनेक मानांकित पुरस्काराने सन्मानित.
◆ प्रकाशित साहित्य -
१) ओंजळ (कवितासंग्रह) (२०१६).
२) मनतरंग (कवितासंग्रह) (२०१८).
३) अंत:स्थ मनात (कवितासंग्रह) (२०२०) (२०२५).
४) अंतरंगाचे तरंग (कवितासंग्रह) (२०२२) (२०२५).
५) वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र) (२०२३) (२०२४)
६) टोपीवाले फुगे (बालकवितासंग्रह) (२०२४)
७) बाया (कवितासंग्रह) - ५६ भाषांमध्ये अनुवादीत कविता (२०२५).
प्रकाशनाच्या वाटेवर -
- स्मृतिगंध (मान्यवर ५० कवींचा परिचय करून देणारा संग्रह)
- मनमीत (कवितासंग्रह)
- अंतर्नाद (गझल संग्रह)
- मनातलं काही…!! (कवितासंग्रह)
- गाव माझो बरो… (मालवणी बोलीभाषेतील कवितासंग्रह)
■■■