मूळ प्रकाशन: मधुरव- बोरू ते ब्लॉग - सुरपाखरू साहित्य
काल प्रसिद्ध सिने अभिनेत्री मधुरा वेलणकर यांचा “मधुरव, बोरु ते ब्लॉग” हा कार्यक्रम पाहिला आणि आज इच्छा झाली की अशा नितांतसुंदर आयोजनाबद्दलच आज लिहावे . हा कार्यक्रम म्हणजे एका कलाकाराच्या सर्जनशील प्रवासाचा जिवंत आलेखच वाटतो. ‘बोरु’पासून ‘ब्लॉग’पर्यंतचा हा प्रवास केवळ साधनांचा नाही, तर अभिव्यक्तीच्या बदलत्या रूपांचा आहे. पूर्वी कागद-शाईतून उमटणारे विचार आज डिजिटल माध्यमातून झरझर…