मूळ प्रकाशन: अक्षरयात्री - सुरपाखरू साहित्य
अर्धा तास रोज सकाळी दहा वाजता तिच्या कामाची वेळ सुरू व्हायची. वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असल्यामुळे बरोबर दहाला पाच कमी असताना जिन्यावर तिची पावलं वाजायची. नीट मिनिट काट्याने बाराचा आकडा ओलांडायच्या आत मस्टरवर तिची सही झालेली असायची. सानिका वेखंडे. साधी सरळ पण आकर्षक राहणी. शांत आणि आत्मविश्वास असलेलं व्यक्तिमत्व. बोलणं तसं कमीच. वागण्यात चपळ. सानिकाचं…