“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

मूळ प्रकाशन: “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?” - सुरपाखरू साहित्य

कधीकाळी गावातल्या,शहरातल्या वाचनालयात संध्याकाळी गर्दी असायची. वर्तमानपत्रातील बातम्यांवर चर्चा रंगायची. कादंबऱ्यांची देवाणघेवाण व्हायची, आणि एखाद्या नव्या पुस्तकाची बातमी म्हणजे एक छोटासा उत्सवच असायचा. आज चित्र बदललं आहे. हातात पुस्तकाऐवजी मोबाईल दिसतो, आणि शांत कोपऱ्यात बसून पानं उलटणारा वाचक दुर्मिळ होत चालला आहे. प्रश्न असा उभा राहतो की पुस्तक वाचणारा माणूस खरंच कमी होत आहे का?…