आरक्षण हक्क की सुविधा? ( लेख माला )
संविधानाच्या 330 आणि 332 ही कलमे आरक्षणाची परिभाषा करतात ते आपण मागेच बघितले आहे. पण याची व्याप्ती बघणारे 334 हे कलम सुद्धा आपण बघितलेले आहे.
330 आणि 332 या कलमानुसार आरक्षण कोणाकोणाला मिळेल हे अनुच्छेद 15 आणि अनुच्छेद 16 यामध्ये अंकित केलेले आहेत पण काळानुसार, राजकीय गरजेनुसार, गरजेनुसार म्हणण्यापेक्षा, दबावानुसार असे म्हणूया, आणि काही सामाजिक परिस्थितीनुसार, त्या त्या वेळी पण विविध जाती प्रजातींना अनुच्छेद 16 आणि अनुच्छेद 15 मध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. त्यासाठी संसदेत विधेयक सुद्धा पास करण्यात आलेले. पण अशी एक परिस्थिती निर्माण होत गेली की हे आरक्षण मर्यादा ही 50% पेक्षाही जास्त व्हायला लागली. त्यावेळी न्यायिक व्यवस्थेने यामध्ये दखल देऊन सुप्रीम कोर्टाने ही मर्यादा 50% पेक्षा जास्त नसावी असे असे निर्देश दिलेत. हे निर्देश 1992 ला देण्यात गेलेत (इंद्रा सहानी खटला (१९९२): यालाच ‘मंडल आयोग खटला’ (Mandal Commission Case) असेही म्हणतात. यात ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
अपवाद: या निकालात असेही म्हटले होते की काही “असाधारण परिस्थितीत” (extraordinary circumstances) ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाऊ शकतेपरंतु हे क्वचितच घडले पाहिजे.) तरीसुद्धा संसदेने संविधानिक संशोधन 103(2019)नुसार (EWS) आर्थिक रुपी कमकुवत समाजाला 10% टक्के आरक्षण देण्याचे संशोधन पारित केले. म्हणजेच आता आरक्षण मर्यादा ही 50% हून 60% पर्यंत झाली. म्हणजेच काय सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश होते ते एका कायद्यानुसार बदलल्या गेले.
या घटनेचे विवरण करत असताना, श्री राजीव गांधी हे पंतप्रधान होते आणि त्याही वेळी सुप्रीम कोर्टाचे आदेश डावळविण्यासाठी संसदेने काही विधेयक पास केले. यासाठी काही राजकीय सामाजिक परिस्थिती असे म्हणता येणार नाही, तरीपण हे विधेयक पास होऊन एका विशिष्ट समाज विशेषला प्रभावित केले होते.
असो यात खोलात न जाता फक्त या घटनेची आठवण झाली हेच इथे सुचवायचे होते किंवा, त्याच घटनेची 103 संशोधनाची पुनरावृत्ती झाली असे आपण म्हणू शकू. किती योग्य किती अयोग्य हे तर काळच ठरवेल. पण आज 75 वर्षे झाले किंवा 80 वर्षी होत आले तरी पण आपण या आरक्षणाच्या विषयावर अजूनही राजकारण चालूच आहे. काही राज्यांच्या विधानसभेने पारित केलेल्या विविध संशोधनानुसार ही मर्यादा त्या राज्यापुरतं 70% पर्यंत सुद्धा पोहोचवण्यात आलेली.
आहे हाच विषय पुढे वाढवू पुढच्या लेखात आणि या लेखमालेचा शेवटचा भागात पुढच्या रविवारी
भेटू अजून पुढच्या लेखात!
जय हिंद! !!
#अक्षरयात्री२०२६ सुरपाखरू #आठवडीलेखनप्रयोग