आरक्षण हक्क की सुविधा ( लेख माला )
आपण मागच्या मालेत जसे बघितलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आरक्षण समितीचे अध्यक्ष होते आणि पूर्ण समितीमध्ये सात सदस्य होते(सरदार वल्लभभाई पटेल: ते संविधान सभेच्या ‘मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक आणि आदिवासी व बहिष्कृत क्षेत्र’ या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते [१.३.१, १.३.५]. आरक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या शिफारसी याच समितीने मांडल्या होत्या [१.४.५, १.५.५].)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना आरक्षण देण्याची मर्यादा ही दहा वर्ष असावी असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्तावित केली होती समजा जर का नंतरही परिस्थिती तशीच राहिली किंवा त्यात सुधारणा झाली पण अजून सुधारणा व्हावी असे अपेक्षित आहे तर ती मर्यादा संसदेला वाढविण्याचा अधिकार देण्यात आलेला होता परंतु सुरुवातीला ही मर्यादा दहाच वर्षाची ठेवण्यात आली होती आणि दहा वर्षात ही परिस्थिती सुधारली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता काही सदस्यांनी दहा वर्षाची मुदत ठेवण्यात यावी या कलमाला विरोध सुद्धा केलेला होता पण त्या विरोधाला नजुमानता डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी दहा वर्षाची मुदत हे कलम अंकित केले
आरक्षण ही त्या काळाची आवश्यकता होती हे सर्वजण मान्य पण करतात पण कालांतराने हा विषय विवादित होत गेला
पहिले ही आरक्षण मर्यादा अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या पुरतीच मर्यादित होती कालांतराने राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती आणि अजून विभिन्नघटके लक्षात घेता ओबीसी यांनाही आरक्षण देण्यात आले आणि अजूनही ओबीसी या गटामध्ये किंवा यादीमध्ये कलमाच्या विविध आवश्यक ते संशोधन करून संसद प्रस्ताव पारित करून विविध जातीप्रजा आणि प्रजातींचा समावेश करून घेतात आश्चर्य हे आहे जे समायोजित आत्ता होणारे घटक जाती प्रजाती यांना आरक्षण नव्हते तरी पण ते प्रगतच होते आणि आत्ताच त्यांना आरक्षणाची गरज भासते
मी जसे वर सांगितले होते डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी आरक्षणाची मर्यादा ही दहा वर्षाचीच ठेवलेली होती आणि संसदेला अधिकार दिलेला होता की पुन्हा पुन्हा ती दहा वर्षाची मर्यादा वाढवण्यात आली यावी आणि ती दहा वर्षाची मर्यादा वाढवण्याची परंपरा अजूनही चालू आहे घटना दुरुस्ती क्रमांक 23(१९६९),45,62,79,95 and 104 (२०३०) म्हणजे आपण म्हणतो आहे स्वातंत्र्याला आपण 75 वर्षे झालेत आणि ह्या 75 वर्षांमध्ये ज्यांना ज्यांना आपण आरक्षण दिले ते अजूनही स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभे राहू शकले नाहीत असाच अर्थ होतो या घटना दुरुस्तीचा बरोबर ना
त्याचबरोबर आपण विविध जाती प्रजातींना योग्य ते संसदेच्या प्रक्रिये नुसार विविध जाती प्रजातींना आरक्षणाच्या कक्षेत आणतो आहे म्हणजे 1947 पासून आत्ताची सामाजिक परिस्थिती हे अजून घातक झाली आहे का असा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो आहे का बहुतेक सर्वांचे उत्तर होच असेल
पुढच्या वेळी आपण 334 335 या कलमांची व्याप्ती कशी कशी वाढली हे बघूया!!!
जय हिंद! !!
#अक्षरयात्री२०२६ सुरपाखरू #आठवडी लेखन प्रयोग