मूळ प्रकाशन: कालाय तस्मै नम: - सुरपाखरू साहित्य
17/2/26 सध्याची कुटुंबपद्धती बहुतांशी न्यूक्लिअर झाली आहे. काळाच्या ओघात बदल अपरिहार्य असतात, पण काही बदल मनाच्या कोपऱ्यात नकळत हुरहुर निर्माण करून जातात. पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धती म्हणजे आई-बाबा, आजी-आजोबा, पणजी, आत्या,काका-काकू, चुलत भावंडे अशा नात्यांनी भरलेलं समृद्ध घर. पहाटेपासून सुरू होणारी धावपळ— चहापाण्याची लगबग, गजबजलेलं स्वयंपाकघर, न्हाणीघरात तांब्याचा चकचकीत बंब, लाकडाच्या विस्तवाचा धूर, त्याची डोळ्यांत चुरचुर……