मुक्तचिंतन: भाग १

मूळ प्रकाशन: मुक्तचिंतन: भाग १ - सुरपाखरू साहित्य

आमच्या 'राजमान्य राजश्री' म्हणाल्या, “काय उगाच मुलांना वारंवार गरज नसताना बोलावता?” आणि त्यांच्या या साध्या, सहज प्रश्नाने मी अंतर्मुख होऊन विचार करू लागलो. खरंच आहे ते, आपण दिवसातून कितीतरी वेळा मुलांना उगाचच साद घालत असतो. कधी ती हाक सवयीची असते, तर कधी त्यामागे आपली अस्वस्थता असते. त्या हाकेचा कोणताही ठोस परिणाम होणार नाही हे माहित…