मी, श्रीधर जहागिरदार. मुक्काम मुंबई. मूळ गाव इंदौर. आता निवृत्त, आभासी जगात स्वतःचीच ओळख शोधत असतो. शिक्षण म्हणाल तर एम एससी.
कार्यालयीन अनुभव- देशी आणि विदेशी बॅंक. बॅंकर ते प्रशिक्षक असा कार्य प्रवास. त्या निमित्ताने बरीच गावे, काही परदेश पाहून झाले.
मुख्य छंद माणूस समजून घेणे. म्हणून मग वाचन,लेखन, गाठी भेटी… फार पूर्वी नाटकातून भूमिका ..
लेखांपेक्षा कवितांमधून व्यक्त होणे आवडते. मराठी कविता समूह या फेसबुकवरील समूहात कविता लिहून शिकलो. काही काळ समूहात संचालकाची भूमिका सांभाळली. मायमावशी या मराठी हिंदी साहित्य समूहात सक्रीय होतो, तिथे शिकलो.
एककविता - एक शब्दखेळ https://share.google/tVamVtIvLO2CsZm0B ब्लॉग आहे माझा.