"साहित्य " आरसा समाजाचा . खरं आहे अगदी . लेखकाचे लेखन समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब असते . आणि ते समाजाला स्पष्ट दिसावे म्हणून हा आरसा खूप स्वच्छ असणे आवश्यक असते.
पण हा आरसा म्हणजे साहित्याने समाजाला फक्त त्याचे प्रतिबिंब दाखवायचे काम करायचे नसते तर हे प्रतिबिंब सुंदर कसे दिसेल ह्याचाही विचार करायचा असतो . म्हणजेच समाज जर वेड्या वाकड्या वाटा चालू लागला तर त्याला वठणीवर आणण्याचे काम सारस्वतांनी आपल्या साहित्याद्वारे करायचे असते. लेखणीच्या कठोर शस्त्राने समाजाला भानावर आणण्याचे काम करायचे असते.
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
आज आमची पिढी काय वाचते आहे ह्याची जराशी झलक पाहू या …
अरे सर्वसामान्यांना सहजतेने वाचायला मिळणारे साहित्य म्हणजे दैनिक वृत्तपत्र आणि त्यातील लेख आणि बातम्या . समाजात काय घडते आहे हेच समाजमनावर पुन्हा पुन्हा बिंबवले जाते आहे . म्हणजे समाज काय बोध घेतोय ? …
अं, हे तर काय असच घडत राहणार.
कॉमन आहे आता हे.
आपल्याला काय करायचे आहे ?
हे ज्याचे काम आहे तो पहात बसेल .
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
पण ह्या चूक गोष्टी घडू नये म्हणून कोणीच पुढाकार घेत नाही. आठवा जरा … सगळीकडे अशीच अंदाधुंदी माजली असताना टिळक, गोखले , आगरकर , सावरकर ह्यांच्या लेखणीची धार जर बोथट झाली असती तर स्वातंत्र्य संग्रामाचे कुंड धगधगते राहिले नसते .
म्हणून सारस्वतांनों आपले साहित्य प्रखर, तेजस्वी असेल तर समाजात ही तेजस्वी लोकांची वाण राहणार नाही. अन्यायाचा प्रतिकार करण्याची सुबुद्धी त्यांना होईल अशी आशा करता येईल.
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
चला तर परजा आपल्या हातातील हे प्रभावी शस्त्र आणि येणार्या नव्या पिढीला , समाजाला अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, सत्याचा मार्ग चोखाळण्यासाठी , चूक रूढींचा नायनाट करण्यासाठी प्रवृत्त करू या .
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६
