दक्षिण दिग्विजय : ५ सुचिंद्रम आणि मेणपुतळ्यांचे संग्रहालय

मूळ प्रकाशन: दक्षिण दिग्विजय : ५ सुचिंद्रम आणि मेणपुतळ्यांचे संग्रहालय - सुरपाखरू साहित्य

२ / १२ / २००८ ठरविल्याप्रमाणे ते टॅक्सीवाले बंधू सकाळी ८ च्या सुमारास आमच्या हॉटेलसमोर आलेत. मस्त प्रशस्त ॲंबेसेडर टॅक्सीत बसून आमचे कन्याकुमारी दर्शन सुरू झाले. ते बंधू आम्हाला कन्याकुमारीपासून जवळपास १५ किलोमीटर असलेल्या सुचिंद्रम मंदिरात घेऊन गेलेत. दक्षिण भारतातल्या अनेक सुंदर मंदिरांसारखे एक सुंदर, स्वच्छ आणि नेटके मंदिर. मंदिरालगत मोठी पुष्करिणी होती. हनुमंताने लंका…