मूळ प्रकाशन: दक्षिण दिग्विजय : ४ कन्याकुमारी – सूर्योदय - सुरपाखरू साहित्य
२ डिसेंबर २००८ पहाटे ४ : ३० ला म्हणजे नियोजित वेळेआधी तब्बल १ तास आम्ही कन्याकुमारीजवळील नागरकोईल नावाच्या स्टेशनवर सहकुटुंब उतरलो. नियोजन केल्याप्रमाणे रेल्वेच्या प्रथम वर्गात निवांत झोप झालेली होती आणि पॅसेंजर गाडीचा प्रथम वर्ग असल्याने खिशाला भुर्दंड पण फ़ारसा बसलेला नव्हता. अनोळखी प्रदेश, अनोळखी गाव. हिवाळा ऋतू त्यामुळे सूर्यदर्शन अंमळ उशीरा होणार त्यामुळे…