तुम्ही ठरवायचं!

मूळ प्रकाशन: तुम्ही ठरवायचं! - सुरपाखरू साहित्य

क्षमाशील जपाची माळ व्हायचं की तलवारीची तेजाळ धार व्हायचं;अनिर्बंध बनून गती मिळवायची की नियंत्रीत राहून शक्ती कमवायची…हे तुम्ही ठरवायचं! गार्गी बनून ज्ञान वाटायचं की मंथरा बनून विष कालवायचं;कसाब बनून आग लावायची की कलाम बनून अग्निपंख पसरायचे…हे तुम्ही ठरवायचं! शतखंड हम्पी पाहून बोटं मोडायची की त्याच हाताची वज्रमूठ बनवायची;बाजीरावाची फक्त मस्तानी आठवायची की त्यांचं अपराजित अजेय…