मूळ प्रकाशन: याला जीवन ऐसे नाव! - सुरपाखरू साहित्य
मुलाच्या घराजवळ असलेल्या ऑकलंड येथील डोळ्याचे पारण फेडणाऱ्या तमाकी नदीकाठी क्षितिजावर एकटा मावळणारा हळूहळू निस्तेज होत जाणारा सूर्य पाहतो आहे…आणि मी पण आज एकटाच नदीकाठी हिरवळीत असलेल्या बाकावर बसलो आहे थोड्या अंतरावर एक चायनीज बॅगपायपर या वाद्याने सुंदर धून वाजवत असताना माझे मन मात्र मागे भूतकाळात रेंगाळते आहे.जीवनाच्या वळणदार, उंच सखल वाटेवर खूप चालून आलो…