लेखक परिचय: माधवी भूत, नागपूर

नमस्कार

मी माधवी भूत (माधूराज)

मी नागपूर ची रहिवासी आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अमरावती येथून झाले.शालेय आणि महाविद्यालयीन कार्यकाळात नाटूकले लिहिणे आणि रंगमंचावर सादर करणे असे छोटे मोठे प्रयोग केले. M.A.(psychology) झाल्यावर अमरावती येथे कौटुंबिक सल्लागार मदतनीस म्हणून काही दिवस काम केले. पुढे नागपूर येथे ग्रामीण विकास तंत्रशिक्षण आणि सोशल वर्क काॅलेज येथे काहीकाळ अध्यापनाचे काम केले. लिडिंग एज मार्केट रिसर्च कंपनी आणि WWICS immigration company चे पदभार सांभाळले.

१९९९ पासून नागपूर आकाशवाणीच्या ‘चिंतन’ या कार्यक्रमासाठी नियमीत लेखन आणि वाचन करते.

करोना काळा पासून नियमीत लेखनाकडे वळले. वैचारीक आणि चिंतनीय लेख लिहिणे. महाभारत आणि रामायण यावर अभ्यासपूर्वक लेख लिहिते आणि ठिकठिकाणी व्याख्याने देते. आतापर्यंत नागपूर, अमरावती, वर्धा, मुंबई, पूणे येथे व्याख्याने झाली/ होत आहेत.

तसेच अनेक कथा स्पर्धा मधून पारितोषिके मिळाली. अनेक मासिके आणि वर्तमानपत्रां मध्ये लेख आणि कथा प्रकाशित झाल्या / होत आहेत.