मित्र कसा असावा ?
चन्दनं शीतलं लोके,चन्दनादपि चन्द्रमाः !
चन्द्रचन्दनयर्मध्ये शीतला साधुसंगतिः !!
ह्या जगात चंदनाला सर्वात शीतल मानले जाते . पण चंदना पेक्षाही चंद्रमा शीतल असतो . पण एक चांगला मित्र ह्या दोघां पेक्षा ही शीतल असतो.
तात्पर्य काय ? चांगला मित्र तुमच्या गुणा अवगुणा सहित तुम्हाला स्विकारतो. वेळोवेळी अतिशय शांतपणाने आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो .
माता मित्रं पिता चेति स्वभावात् त्रतयं हितम् |
म्हणजेच आई वडील आणि चांगला मित्र नेहमी तुमच्या कल्याणाचा निःस्वार्थ पणे विचार करतात.
जगात नि:स्वार्थ मैत्रीची असंख्य उदाहरणे आहेत .
मैत्री कुणी कुणाशी करावी ?
मुलीने मुलीशी ? मुलाने मुलाशी ? माणसाने माणसाशी की माणसाने प्राण्यांशी?
अरे मैत्री ही मैत्री असते . ती निखळ , पवित्र, शुद्ध असेल तर ती कोणीही कोणाशीही करू शकतो . फक्त ती करताना समोरची व्यक्ती तितकी शुद्ध मनाची आहे किंवा नाही हे तपासणे मात्र गरजेचे असते .
मैत्री शुद्ध असेल तर तिचा दरवळ आपसूकच दूरवर पसरतो . जसे गुलजार जी म्हणतात -तुम्ही व. पु. काळेंचे "माणसं " हे पुस्तक वाचलं आहे का ? त्यात ते एका ठिकाणी म्हणतात
“मित्र एकदा पूर्ण कळला की रागाला जागा उरत नाही .”
मित्र हा एक सहयोगी असावा . तुमच्यातल्या दोषांना अलगद बाजूला करण्याचे कसब त्याच्यात असावे. तुमच्या प्रगतीने सुखावणारा, तुमच्या अधोगतीने तळमळत राहणारा असावा.
तुमचा पथदर्शक , योग्य अयोग्याची जाणिव करुन देणारा , सदोदित सत्याची कास धरायला लावणारा ( जसे सार्थ आणि पार्थ ) असावा .
तुम्ही संकटात आहे हे पाहून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता तुम्हाला संकटातून बाहेर पडायला मदत करणारा ( जसे महाराणा प्रताप सिंह आणि चेतक नावाचा घोडा).
शिवाजी महाराजांसारखा दिसणारा जीवा , खरोखरच जिवावर उदार होऊन महाराजांना आग्र्याहून सुटका होण्यासाठी मदत करणारा, मृत्यूच्या अखेरच्या क्षणापर्यंत साथ देणारा संभाजी महाराजांचा सखा कवि कलश, अशी कित्येक उदाहरणे इतिहासातून अनुकरणीय आहेत.
माझ्या कुटुंबाला ही असा एक मित्र मिळाला होता. तो म्हणजे आमचा श्वान . त्याचे नाव सख्याहरी . चौदा वर्षे तो आमच्या बरोबर होता. आमच्या मनातले भाव अलगद टिपणारा टिपकागद होता तो. माझ्या सासर्यांच्या मृत्यू नंतर सर्व विधी आणि चौदावा दिवस होईस्तोवर तो जेवलाच नाही . आपला उपास त्याने प्रसाद घेऊनच सोडला .
तुमचा सहचर हा सुद्धा तुमचा खूप छान मित्र असतो . तुमच्या मनातील आनंद , रुखरुख , दुःख त्यालाही सहज समजतेच जर तुम्हीही त्याचे तितकेच छान मित्र असाल.
अशा सर्व प्रकारच्या मित्रांशी मैत्री राखा . मित्रत्व जपा .
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६