१. *आठवण*
आठवण
तुझ्या माझ्या
भेटीची आणि प्रेमाची
रात्रंदिवस स्वप्नांच्या जगात रमण्याची
आठवण
तुझ्या माझ्या
लग्नाची आणि मिलनाची
संसार वेल बहरताना पाहण्याची
आठवण
संसारात रमण्याची
रुसण्याची आणि भांडणाची
भांडून पुन्हा एकत्रित येण्याची
आठवण
तुझ्या माझ्या
मुलांना प्रवाहात सोडण्याची
त्यांच्यापाठी खंबीर उभे राहण्याची
आठवण
त्या पैलतीराची
हातातील हात निसटल्याची
तरीही धडपडत साथ देण्याची
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
२.*शेवटचे वळण*
आठवणी माझ्या सरणार नाही,
तुला मी विसरणार नाही,
वाटेवरच्या त्या वळणावर,
जरी मी तुला दिसणार नाही.![]()
असा तू बावरू नकोस,
पाऊल मागे घेऊ नकोस,
वाटेवरचे ते वळण, ![]()
पार करायला विसरू नकोस.
वळणाच्या त्या पलीकडे,
ताटव्याने मोगरा फुलला असेल,
प्रत्येक फुलाच्या गंधा मागे ,
सावली माझी तुला दिसेल.![]()
गंध भरल्या सावलीनीशी,
तुला सोबत करत राहीन,
तुला विजयी झालेला,![]()
दुरूनच मी पहात राहीन.
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
३.*काय गुन्हा केला*
सांग सखये काय गुन्हा केला ,
सर्व संगे संसार त्याग केला
दिली होती आण मीच मज गे
जपीन तुजला प्राण प्रतिष्ठेने
काय सांगू त्या वृद्ध माय ताता ,
काय कथु त्या भगिनीं आणि भावा
कशी निर्लेप अशी तू झाली
दोघी तनया विकल अति होती.
करोना तो काळ बनूनी आला
स्वये संगे तुज घेऊनी पळाला
बहुत विनये प्रार्थिले तयाला
तरी दुष्टा ने घात मला केला.
कसा राहू ह्या थोर महाली गे
तुझ्या विना हे भगभगीत सारे.
वृथा वाटे पदवी वैद्यकीची
नसे आता लालसा धनाची.
सांज समयी एकलाच मी गे
आठवानी तुज सी आळवी गे.
पुनः जन्मा येशील कधी तू गे?
पुन्हा मजला भेटशील का गे ?
©® सौ.मंजूषा श्रीकांत अपराजित
सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६