मूळ प्रकाशन: चमत्कारांना नमस्कार - सुरपाखरू साहित्य
बऱ्याच दिवसांपूर्वीची गोष्ट . एका इंजिनियर-कम-लेखक असलेल्या मित्राची भेट झाली . बोलताना त्याने तो ज्ञानेश्वर माऊलींवरील एका सविस्तर , ससंदर्भ पुस्तकावर काम करत असल्याचे सांगितले . मी अर्थातच आनंद व्यक्त केला . “पण एका मुद्दयावर गाडी अडलीय”, तो. “कोणत्या?”“ज्ञानेश्वरांचं आयुष्य मोठं चमत्कृतीपूर्ण आहे . रेड्याच्या तोंडून वेद वदविले , भिंत चालवली वगैरे . मला असे…