मूळ प्रकाशन: भारतीय चित्रपट – बिंब, प्रतिबिंब - सुरपाखरू साहित्य
मुकपटा पासून भारतीय चित्रपट सृष्टीची वाटचाल सूरू झाली. १९१३ मध्ये पहिला मुकपट दादासाहेब फाळकेनी “राजा हरिश्चंद्र” पडद्यावर आणला. आता त्याला ११३ वर्षे झाली. १९३१ म्हणजे साधारण १८ वर्षांनी भारतात पहिलावहिला हिंदी बोलपट “आलामआरा” अर्देशीर इराणी यांनी दिग्दर्शित केला. त्यालाही आता ९५ वर्षे झाली. सांप्रत काळात प्रतिथयश लोकांनी चित्रपट क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले. रुळलेली वाट…