मनाने मनाला दिलेला विषय . मनातले थोडेसे सांग ना. खूप छान विषय . पण थोडेसे सांगणे तेही मनातंले किती कठीण ग…
थोडे मनातले … काय सांगू ? आधीच मनाचा ठावठिकाणा नाही. फुल बॉडी स्कॅन करून सुद्धा अतिशय निष्णात डॉक्टरांना सुद्धा त्याचा पत्ता अजून कळला नाही . अशा त्या अदृश्य मनातले थोडेसेच सांगायचा विचार केला तर त्यातल्या असंख्य आठवणी जाग्या झाल्या .
काही सुखाच्या, आनंदाच्या तर काही दुःखाच्या . काही आपल्यांच्या , काही परक्यांच्या . काही मनात घर करून बसलेल्या लोकांच्या , काही दूर निघून गेलेल्या आपल्यांच्या.
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
करोनाचे दिवस खूप रडवून गेले . हातात हात घालून लहानाचे मोठ्या झालेल्या आम्ही बहिणी. अचानक माझी मोठी बहिण त्या करोनाने गिळंकृत केली. ती जखम अजूनही भळभळते आहे. कोणाला सांगू हे मनातले थोडेसे ?
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
आयुष्यात आनंद मिळालाच नाही असे नाही. पण त्या साठी खूप झगडावे लागले. प्रत्येक वेळी सुखाचा घास गिळताना दुःखाचा आवंढा गिळला. तोही निमुटपणे . असो .
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
महा कवयित्री बहीणाबाई चाैधरी ह्यांच्या काव्यस्मृतीस आदराजंली अर्पण करून मी माझ्या मनाचे रंग तुमच्यासमोर उलगडते …
मन वढाय वढाय,
त्याचा शरीरी निवास।
कधी ब्रह्मांड व्यापले,
कधी पिंडी करी वास ||१||
मन वढाय वढाय
त्याचे रंग गं निराळे।
हर रंगात रंगता
त्याचे भाव गं आगळे ||२||
मन वढाय वढाय,
शुभ्र रंगाने रंगले।
माय शारदेचा मग,
शब्द होऊन नाचले ||३||
मन वढाय वढाय,
काळ्या रंगात नहाले।
जणू विठ्ठल सावळा,
भक्तिरसाने भारले ||४||
मन वढाय वढाय
निळाईने चिंब झाले ।
कृष्ण सखा प्रकटला
सूर पाव्याचे गुंजले॥५॥
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६