कला अनमोल! तरी मोल तिजला नाही…
लेख क्रमांक ११
’ हेमंता, अरे संजयला समजावं गायनापेक्षा जरा अभ्यासात लक्ष घाल..फक्त्त कला ही उपजिविकेच साधन बनू शकते का? तुच तुझ्या मित्राला समजावून सांगरे बाबा.. मी समजावून समजावून थकलो. अण्णाकाका बोलत होते.
काय बोलावे त्यावेळी मला काही सुचले नाही.मी फक्त्त बारावीत होतो तेव्हा.पन्नास वर्षसपूर्वीचा हा प्रसंग!
संजय आता बँकेतून रिटायर झाला आहे आवाज अंत्यत सुंदर गोड असून मित्राची मेहफिल जमली की त्याचे गाणे ठरलेले असतें.
आज अण्णाकाकांचा तोच प्रश्न आठवला आणि लिहीण सुरु करतोय.
देशाकडून क्रिकेट खेळणारे फक्त्त अकरा असतात आणि ते स्वप्न पाहणारे लाखो..
बर एकदा सचिनसारखा मिळाला तर पंचवीस वर्ष ती जागा त्याची पक्की असते.
अगदी कलाकारचेही तसाच असत.एकापेक्षा एक कलाकार संधी अभावी मागे आहेत.
कला ही ईश्वराने दिलेली देणगी असली तरी ती जोपसण्यासाठी, तिच्या संवर्धनासाठी या कलेची साधना हवीच.
कोणतीही कला जो पर्यत ती एनकॅश होत नाही तो पर्यत तिजला छन्द किंवा आवड अशा स्वरूपात मानले जाते. तिला व्यावहारिक किंमतही नसते मग ती गायनाची असो व लेखनाची.
इतर लोकांना तर तो तुम्ही केलेला उगाचचा टाईमपास वाटतो.फारच कमी जण असे असतात की त्यांचा छन्द कला हेच उपजीविकेच साधन असत.कलेतून पैसा मिळायला लागतो तेव्हाच समाज त्याला कलाकार म्हणून मान्यता देतो.मग त्यास व्यवसायिक कलाकार म्हणून शिक्काही बसतो. मुलगा नाटकाच्या नादी लागून वाया गेला म्हणून विवंचनेत असलेली नोकरी पेशाचे आईवडील जेव्हा तो सिरीयलचा हिरो होतो बक्कळ पैसा कमावतो तेव्हा कौतुक करताना दिसतात.
एक प्रसंग आठवतो,तीस वर्षापूर्वी मोरूची मावशी हे विनोदी नाटक भुसावळ येथे रोटरॅकट क्लबने फ़ंडरेझिंग साठी आणलं असताना विजय चव्हाण प्रदीप पटवर्धन आदी कलाकार माझ्या घरी चहासाठी आले हॊते.
मोरूची मावशीच्या भूमिकेतील विजय चव्हाण बोलून मोकळे होते. रात्रीचे नाटक असल्याने संध्याकाळी त्या नाटका तील काही कलाकारांना पूर्वेस उगम पावणारी पवित्र अशा भुसावळची सूर्यकन्या तापीचे दर्शन घडवले होते.
प्रदीप पटवर्धन त्या वेळी बँकेत काम करत होते.. त्यावेळी खूप सिरीयल आणि नाटक असताना तुम्ही नोकरी का करतात? असा प्रश्न त्यांना जिज्ञासाने विचाराला असता…त्यांनी, " बँकेतील नोकऱीही माझी उपजीविका.. कलेतून उत्पन्न मिळण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो तो किती असेल हे सांगता येत नाही.. आणि शेवटी अनिश्चितता आहेच. " असे उत्तर दिल्याचे चांगले आठवते.
रंगभूमीवरचे पाहिले सुपरस्टार बालगधर्व यांचे नाटक प्रत्यक्ष बघितले असे अभिमानाने आमचे आजोबा सांगायचे.त्यांनाही शेवटी नियोजनाअभावी कठीण दिवस पहावें लागले होते.
एवढे मोठे संगीतकार गायक असूनही कलाकार म्हणून प्रस्थापीत होण्यासाठी दिलेला लढा बाबूजी सुधीर फडके यांनी त्याचे आत्मवृत्तात वाचण्यात आला आहे.
अमिताभसारखे काही अपवाद वगळता, कलाकार म्हणून मान्यता मिळाल्यावरही तुमचे चलतीचे दिवस मोजकेचे असतात..
मराठी सिरीयल मधे एखादी सिरीयल हीत झाल्यावरही योग्य कामाच्या प्रतीक्षेत बरेच कलाकार दिसतात. चलतीच्या काळात केलेली कमाई राखून ठेवली पाहिजे. २००२ पासून पेन्शन बंद झाले असल्याने असल्याने भविष्यासाठी बचत हा नियम आता सर्वांनाच लागू आहे.
असो.
"कोणतीही कला नवनिर्मितीचा सृजनशीलतेचा आनंद नक्की देते पण त्यातून अर्थ प्राप्ती होईलच याची खात्री नाही.
कलाकारास सरस्वती पूजक मानले जाते आणि तो प्रत्यक्षात असतोही.. पण लक्ष्मी आणि सरस्वती एकाच ठिकाणी नांदताना फार कमी वेळा पाहण्यास मिळते.
मोल कलेचे!!
कला आहे अनमोल
मोल तिजला नाही
कलाकार खूप सारे
का राहतात उपाशी..
लढाई त्यांची होती
स्थापित होण्यासाठी
झाले कुणी नशिबाने
उलटली कुणाची चाळीशी..
मतितार्थ एक आज
कलेवर न अवलंबून रहावे
दुसरे अनेकही आपुले
इन्कमसोर्स असू द्यावे..
लयास गेले राजे जेथे
कलेला राजाश्रय होता
AI आले नविन आता हो
प्रसंग कलाकारापुढे बाका..
आनंद मनाला मिळतो
कलेच्या त्या साधनेने
जगण्याला लागे पैसाही
मिळतो तो कष्ट अन नशिबाने!!
हेमंत नाईक..
११. ०१. २०२५
सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६