मूळ प्रकाशन: दक्षिण भारतवारी: रामसेतू, मरुत्वमलाई आणि एक काळरात्र - सुरपाखरू साहित्य
लग्नानंतर माझी आणि तुषारची, आई आणि ताईसोबत बाहेरगावी जाण्याची ही पहिलीच सहल होती. लग्नाला सहा महिने झाल्यावर, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही सगळे तामिळनाडू एक्सप्रेसने नागपूरहून चेन्नईला मनोजकडे गेलो. तिथे दिवसभर आराम केला आणि संध्याकाळच्या गाडीने रामेश्वरमला निघालो. रामेश्वरमवरून आम्ही कन्याकुमारीला गेलो आणि तिथून पुढे नागरकोईलला. नागरकोईलवरून आम्ही तिरुअनंतपूरमला गेलो आणि तिथून रेल्वेने परत नागपूरला…