डोक्यावर गाठोडं आणि चेहऱ्यावर हास्य... कुठे गेला असेल बसवप्पा?

मूळ प्रकाशन: डोक्यावर गाठोडं आणि चेहऱ्यावर हास्य… कुठे गेला असेल बसवप्पा? - सुरपाखरू साहित्य

तिचं सासर शहराच्या काहीशा बाहेरच्या भागात होते. बंगल्याभोवती छान फुलाफळांची बाग होती. घरामध्ये पणजी बाई, आते सासू ,चुलत सासू ,सासरे अशी अनेक माणसं होती. नवीनच़ं लग्न झाले असल्यामुळे घरातील सर्व व्यवस्था, नोकर चाकर इत्यादींची हळूहळू माहिती होत होती. बागेची झाडझूड, स्वच्छता इत्यादी करण्यासाठी आठ दहा दिवसातून एकदा बसवप्पाचा फेरा डुलत डुलत ति च्या घरी येत असे. डोक्यावर एका गाठोड्यात त्याचे कपडे वगैरे सर्व संसार…