पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा -१

लेख क्रमांक ५

“पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा -१”
.. हेमंत नाईक
०५. ०१. २०२५

"बाबू मोशाय, हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिसकी डोर ऊपर वाले के हाथ में है, कौन कब कहां उठेगा, कोई नहीं जानता!

हे जीवनाचे सत्य सिनेमाच्या शेवटी टेपरेकॉर्डद्वारे सांगणारा, सुपरहीट संवाद असलेला
राजेश खन्ना व अमिताभचा आनंद हा सुपरहिट पिक्चर आपण सर्वांनी बघितला असेलच…

पण तशाच काहीसा प्रकारचा दुर्दैवी प्रसंग आम्हा शाळेतल्या मित्रांना वर्षभर प्रत्यक्षात अनुभवास मिळेल असे वाटल नव्हतं.

मे २०२४

"दुःख व्यक्त कराव की मनात ठेवावं अशी द्विधा मनस्थिती बऱ्याच वेळा होत असतें बहुतेक वेळा दुःख वाटण्यास सहजासहजी कोणी तयार नसतो! "

आज सकाळी मोबाईलवर नाशिक हून बालमित्र दिनेशचा फोन आला, “काय हेमंत कसा काय आहे,? मजेत आहे ना?” इकडच्या तिकडंच्या गप्पा झाल्यावर, दिनेश म्हणाला, “हेमंत, हल्ली मी गळ्यात पोपट पाळलाय.”

“अरे, अस कोड्यात बोलू नको मला काही कळतं नाही तुला काय म्हणायचंय ते!”

“अरे कालच बायोप्सी करून आलोय रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय! अन्ननलीकेचा कर्करोग असे निदान झालाय.”

आता मात्र मी एकदम हबकलोच काय बोलाव ते सुचेना,
“काय सांगतोय तू? सेकंड ओपिनियन घें. रिपोर्ट चुकू शकतो. परत टेस्ट कर पेट स्कॅन करून घें.”

माझा बदलेला काळजीचा सुर चाणाक्ष दिनेशने लागलीच ओळखला.. “अरे सर्व ओपिनिअनस टेस्ट रिपोर्ट झालेत मुंबईलाही जाऊन आलो आणि तू काय काळजी करतोय. मला कर्करोग झालाय आणि मी बिनधास्त आहे बघ!! मी नक्की बरा होणार आहे याची खात्री आहे. फक्त्त दोन केमोची गरज पडेल असे डॉकटर म्हणाले. माझ्या जवळच्या नातेवाईकांस असेच दुखणे सात वर्षापूर्वी झाले होते आज ते ठणठणीत आहे. आपल्या इगपुरीच्या शाळेच्या गेटटुगेदरपर्यत दोन्ही केमो पूर्ण होणार. मी नक्की येणार तेथे. तू काळजी करू नको.”

दुःखाच्या बाबतीत माझ्या मनात आलेल्या विचारात दिनेशचा अशाही कठीण स्थितीत आलेल्या आनंदीस्वरातील फोन वरील संभाषण मला
“दुःख हे मानलं तरच ते वाटत आणि कोणत्याही स्थितीतही आनंद कसा साजरा करायचा, हेच ते सांगुन गेलं”"

केव्हा काय घडेल ते
माहित नाही कुणाला
घडेल जरी विपरीत
व्हा सामोरे तयाला!!

उगाच भांडणतंटा
का स्वार्थ जोपासता
दिवस किती बाकी
माहित नाही कुणाला..

आयुष्याची दोरी
अतूट नाही ती कधी
नाते सर्व मधुर हवे हो
पीळ नको तयाला!!

रडत जरी आलो हो
हसत हसत ते जावे
नाही आपुले काही
मनी पक्के असू द्यावे!!

जीवनी आपले सुंदर
कार्य असे ते असावे
जाताना इतर डोळ्यांना
आसवांचे पूर खूप यांवे!!

वेळ बाकी खूप कमी ती
भराभर आयुष्य ते जाता
सुख दुःख मानुनी एक
दुःखातही आनंद मिळवावा!

क्रमश:

..हेमंत नाईक
०५. ०१. २०२६
सुरपाखरू#३०दिवसात ३०#प्रयोग२०२६

1 Like