विषयातून "विषय"शोधला!

लेख क्रमांक ४

“विषय”

:writing_hand:हेमंत नाईक

तीस दिवस सातत्याने लिहिणं कठीण आहे.एखादे कथाबीज व एखादी घटना तुम्हाला लिहिण्यासाठी स्फूर्ती देते.आजचा लिहिण्याचा विषय कोणता घ्यावा हे मनात घोळत असताना विषय हाच विषय घेऊन काही लिहीतो आहे.

पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.जुने बरेच लेख लिहिले आहेत त्यात “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला त्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता. काळाच्या ओघात “बदल” होतात. कालच हा विषय घेऊन मी काही लिहीलं आहे.

ज्या गोष्टीचा माझ्या आयुष्यावर व मनावर परिणाम झाला ते विषय शोधून खूप काही झालं लिखाण झालं असल तरी ते मी पोस्ट करू शकत नाही. रोज काहितरी नविन लिहा आणि तेही तीस दिवस सातत्याने ही प्रमुख अट आहे.

विषय शोधला की नक्की सापडतो.. त्याबाबतीत चौफेर विचार करता शब्द सुचू लागतात मग ओळी. बघता बघता लेख तयार होतो. आपला लेख व कविता इतरांना आवडेल का याचा विचार अजिबात करू नये कारण आपण लिहिलेले जर खरं प्रामाणिक आणि मनापासुन असेल तर नक्की त्यांचाही अनुभव तसाच असल्याने ते नक्की भावते.

अनुभवल ते लिहिणं सोपे आहे पण कल्पनाविलास करण त्यामानाने कठीण आहे.

विषय कोणता घ्यावा.. त्यात काय लिहावं?

पर्यटन,कथा, अनुभव,समीक्षा, प्रसंग, विचार, कविता, आठवणी अगदी काहीही लिहीलं तरी चालत. फक्त्त ते मुद्देसूद असावं.अगदी एखादा शब्द घेऊन सुद्धा त्यावर लिहिता येते.

" प्रत्येकाचं जगलेल आयुष्य हे एक अगणित पानाची सुंदर कादंबरी आहे जिचा तो स्वतः नायक आहे. त्यातील काही आठवणी लिहिल्या तरी तीस दिवस सहज निघून जातील. "

एकदा एका मित्राने सुंदर लिखाण मला पोस्ट केल होत. खाली टीप लिहिली त्यात म्हणाला, मी तुझ्यासारखं लिहू शकलो नाही तरी तू वाच. हा त्याचा गोड गैरसमज होता.प्रत्येकाची लिखाणची शैली वेगळी असतें. त्यातून काहीतरी शिकण्यासारख नक्की असत.

जसे देवाने अनेक रूप दिली आहेत काही प्रसन्न आनंद देणारी असतात काही तेवढी नसतात. प्रत्येकाची सौंदर्य दुष्टी वेगळी असतें. तसंच काहीस लिखाणाचही असत. आपण लिहिलेली कविता आणि लेख ही आपल्या अपत्याप्रमाणे असतात. काही वेळा कविता प्रसवली हा शब्द प्रयोग सर्रास वापरला जातो. दुसऱ्याच मुलं कितीही सुंदर असाल तरी आईच आपल्या मुलावरच निस्सीम प्रेम असत अगदी तसंच प्रेम प्रत्येकाला आपल्या लिखाणाबद्दल प्रेम असतें.. ते असावं आणि ते वाटणही साहजिक आहे. आपल लिखाण दुसऱ्याला आवडेल का ही भावना लिहिताना अजिबात नको.. स्वतःच्या आनंदासाठी लिखाण हव.

विषय खूप आजूबाजूला

चिंता लिखाणाची कशाला..

आनंद घ्या व्यक्त होण्याचा

उगा प्रश्न..वाचेल का कोणी लेखाला!!

लिहितो वाट्टेल ते मी

मनात जे माझ्या येते..

आठवण पर्यटन प्रसंग

स्फूर्ती चालना ती देते!!

“शब्द” एकही कधी पुरतो

लेख तो लिहिण्यासाठी..

स्फूटलेखन त्याला म्हणता

जे जाणकार तयासाठी!!

तीस दिवस नित्य लिहिण्याचा

प्रयत्न सुरपाखरांच्या थव्यात..

वाचकरुपी फुलपाखरू होऊन

लेखांचे आस्वादही मी चाखणार!!

:writing_hand:हेमंत नाईक

०४. ०१. २०२५

सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६

Yahoo Mail: Search, organise, con

2 Likes