मूळ प्रकाशन: सुरपाखरू: नवनिर्मितीचा आणि धाडसाचा सुंदर प्रवास - सुरपाखरू साहित्य
सुरपाखरू उडाले रे … किती समर्पक नांव शोधले आहे या प्रकल्पासाठी. सूर पाखरू … #सुरपाखरांचा थवा. फुलपाखराची जन्म कथा आणि लेखकाची जन्मकथा यात बरीच साम्यस्थळे सापडतात. फुलपाखरू उडत उडत एखाद्या फुलझाडावर विसावते आणि सहजपणे एका पानावर आपले अंडे सोडते. तसेच कुठून तरी उडत उडत एक कल्पना लेखकाच्या मन-पानावर विसावते. हे ‘कुठूनतरी’ म्हणजे … प्रदूषणीय धुरात असते, प्रदर्शनीय पुरात असते कोकिळेच्या स्वरात…