'सुरपाखरू: ३० दिवसांत ३० लेख' - कार्यपद्धती आणि नियम

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालील साधी आणि सोपी कार्यपद्धती आपल्याला पाळायची आहे:

१. लेखनाचे स्वरूप:

दररोज किमान २५० शब्दांचा एक मराठी लेख लिहावा. हा मजकूर केवळ एक ‘पोस्ट’ नसून तो वाचकाला समजेल असा एक ‘सुसंबद्ध लेख’ असावा. (विषय आणि वेळ तुमची, सातत्य आमचे!)

२. प्रसिद्धीची वेळ (Deadline):

तुमचा लेख त्या त्या दिवशी मध्यरात्री १२ वाजण्यापूर्वी (तारीख बदलण्याआधी) आपल्या फेसबुक भिंतीवर (Wall) पोस्ट करणे आवश्यक आहे. (टीप: जे लेखक फेसबुकवर नाहीत, त्यांनी 'सुरपाखरू’च्या वेबसाईटवर लेख पोस्ट करण्याची मुभा आहे.)

३. रेकॉर्डसाठी ईमेल:

फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर, तोच लेख किंवा त्याची लिंक 'सुरपाखरू’च्या अधिकृत ईमेल आयडीवर रात्री १२ च्या आत पाठवावी. हे केवळ संकलनाच्या आणि रेकॉर्डच्या सोयीसाठी आवश्यक आहे.

४. हक्क आणि परवानगी:

तुमच्या लेखाचे संपूर्ण स्वामित्व (Copyrights) तुमचेच राहतील. केवळ भविष्यात नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा उदाहरणादाखल तुमचे काही उतारे तुमच्या नावासह वापरण्याची परवानगी आम्ही गृहीत धरत आहोत.

५. हॅशटॅग्स (Hashtags):

सोशल मीडियावर लेख पोस्ट करताना खालील हॅशटॅग्स वापरणे अनिवार्य आहे, ज्यामुळे तुमचे लेख शोधणे सोपे जाईल: सुरपाखरू ३०दिवसात३० #प्रयोग२०२६

एकट्याने का नको? समूहात का? हे आव्हान तुम्ही एकट्यानेही पेलू शकता, पण म्हणतात ना, “जग हे असंख्य बारगळलेल्या संकल्पांनी तुडूंब भरलेले आहे.” एकट्याने सुरू केलेला प्रवास अनेकदा अर्ध्यावर सुटतो.

सुरपाखरू समुदायात आपण:

  • एकमेकांचे वाचतो आणि समृद्ध होतो.
  • चार विशेष ऑनलाईन सत्रांतून नवे काहीतरी शिकतो.
  • केवळ लेखक म्हणून नाही, तर एका कुटुंबाचा भाग म्हणून हा प्रवास करतो.

जानेवारी २०२६ चे पथक तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. चला, लिहूया! (टीप: काही कारणास्तव ३० दिवस पूर्ण झाले नाहीत तरी हरकत नाही. इथे कोणतीही ‘शिक्षा’ नाही, उलट जितके लिहाल ती तुमची 'मिळकत’च असेल!)