हॅशटॅग #सुरपाखरू म्हणजे काय?

सामाजिक माध्यमांवर लेखांची मालिका लिहिणार असू किंवा एकमेकांशी संबंधित पोस्ट करणार असू तेव्हा हॅशटॅग वापरायची पद्धत असते. एक निडलेला शब्द (ज्यात मधे स्पेस नसेल, दोन शब्द जोडायला अधोरेखन चिन्ह [अंडरलाईन] चालते) घेऊन त्याला समोर # असे चिन्ह लावले की त्याला हॅशटॅग समजले जाते.

.

सामाजिक माध्यमे अश्या हॅशटॅग लावलेल्या अनेक पोस्ट, अनेक लोकांनी केलेल्या पोस्ट एकत्रित दाखवायला एक वेगळे पान उपलब्ध करून देते, ते देखील फक्त असा हॅशटॅग लावताच आपोआप होते.

.

या वर्षी जानेवारी २०२५ आणि जून २०२५ एकूण सोळा प्रयोगशील लेखकांनी संकल्प सोडून अनेक लेख लिहिले आणि फेसबुक वर पोस्ट केले त्याला त्यांनी सुरपाखरू असा हॅशटॅग आवर्जून वापरला. फेसबुक ने लगेच त्याचे वेगळे पान उपलब्ध केले, खालच्या दुव्यावर टिचकी लावून तुम्ही पाहू शकता. तुमच्या मित्र यादीत असलेले काही लेखकांच्या त्या पोस्ट तुम्हाला दिसतीलच, त्याबरोबरच अनेक नव्या लेखकांच्या पोस्ट देखील दिसतील आणि वाचता येतील.

https://www.facebook.com/hashtag/सुरपाखरू

.

समविचारी आणि समकालीन साहित्य शोधायची ही सुंदर पद्धत आहे, हॅशटॅग लावणे.

.

जानेवारी २०२६ मधे आम्ही पुन्हा नवा प्रयोग करतो आहोत, अधिक माहितीसाठी खाली दिलेले हॅशटॅग बघावे, आणि मागच्या पोस्ट मधे एक गुगल फार्म ची लिंक आहे त्यात तुमची माहिती दिली तर सुरकाखरू बद्दल माहिती व्हॉटसॅप गटात देखील विचारता येईल.

.

#सुरपाखरू। #३०दिवसात३०। #प्रोग२०२५