कच्चा लिंबू

मूळ प्रकाशन: https://www.surpakharu.in/?p=147

पटांगणावर खेळणाऱ्या मुलांचा खेळ रंगात आला होता.रविवारी सकाळी कॉफीचा कप घेऊन निवांतपणे खिडकीत बसून पटांगणावर चाललेले खेळ,गप्पा, भांडा- भांडी बघण्याचा छंदच लागला आहे. कोणीतरी बॅटिंग करायला आलं, एक दोन बॉलमध्येच आऊट झालं. तेवढ्यात गटातले कोणीतरी ओरडले….’अरे…करू द्या त्याला बॅटिंग अजून…. तो कच्चा लिंबू आहे!’‘कच्चा लिंबू’ हे शब्द ऐकले आणि पटांगणात गुंतलेले डोळे आणि कान मेंदूकडे…