मूळ प्रकाशन: उमटती ज्ञानाची पाऊले…. - सुरपाखरू साहित्य
वर्गात शिरताच सर्वात प्रथम नजरेत भरतो तो म्हणजे काळ्याभोर रंगाचा फलक आणि त्यावर लिहिलेला रोजचा नवीन सुविचार ! विद्यार्थ्यांच्या दिवसाची सुरुवात एका उत्तम विचाराने करून देणारा हा फलक आणि त्यावर केलेले लेखन शिक्षक आणि विद्यार्थी यांना परस्पर जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं फार विलक्षण असतं. त्यांच्याकडे बघणाऱ्यांना यातलं मर्म जाणवेलच…