मूळ प्रकाशन: Live From The Field - सुरपाखरू साहित्य
नागपूरचा इतिहास २३ जुलै २०२६
नागपूरकर भोसले सेनाधुरंधर मुधोजीराजे यांची रौप्य तुळा!
सेना धुरंधर मुधोजीराजे हे महाराज रघुजीराजे व राणी बालाबाई यांचे पुत्र होते. इ.स.१७५६ मध्ये सावनुर अभियानात उत्तम कामगिरी बजाविल्याने त्यांना पेशवे बाळाजी बाजीराव यांनी सेना धुरंधर हि उपाधी देऊन त्यांचा गौरव केला होता. महाराज रघुजीराजे दुसरे हे २४ जून इ.स. १७७५ रोजी मसनंदीवर बसले. पण रघुजीराजे अल्पवयिन असल्याने राज्यपाल म्हणून सेना धुरंधर मुधोजीराजांनी नागपूर राज्याची सुत्रे हाती घेतली आणी इ.स.१७८२ पावेतो राज्यकारभार केला . सेना धुरंधर मुधोजीराजे यांनी इ.स. १७७५ मध्ये उमरेडचा किल्ला बांधला तसेच नगरधनच्या भुईकोटाचा जिर्णोधार करून तेथे वाडा बांधला. इ.स.१७८२ सुमारास त्यांनी शुक्रवारतळयाच्या पाळीवर श्री सिद्धीविनायक मंदीर बांधले .
नंतर २१ सप्टेंबर इ.स.१७८३ रोजी अबांळा तिर्थाकाठीसेनाधुरंधर मुधोजीराजे यांची रौप्य झाली
‘‘श्रीमंत रघुजीराजे राजश्री सेना धुरंधर मुधोजीराजे खंडोजीराजे व व्यंकोजीसाहेब व सौभाग्य संपन्न मातोश्री चिमाबाईसाहेब तिर्थस्नानार्थ अंबाळा तिर्थास गेले. श्रीरामटेक क्षेत्रापासून पूर्वेस अर्था कोसांवर अबांळा तिर्थ आहे. तेथे तिर्थाकाठी मुधोजीराजांनी वाडा बांधला आहे. मातोश्री चिमाबाई वैगरे यासं तिर्थस्नान करण्याकरता घाटावर पाण्याचे आतून कंनादा बाधल्या. ग्रहणाच्या समयी सेना धुरंधरांची रौप्य तुला केली४. त्यांनी धाकली कन्या झिंगाबाई व नातु बाळासाहेब तुलेत घेतले! तुले बारा हजार चांदिचे रूप्ये लागले.दुसरे दिवशी तुलेचे द्रव्य ब्राम्हणांना दिल्हे ‘‘ या प्रसंगि पत्रकार मल्हरजी नाईक वोरपे उपस्थित होते.
पूढे १९ मे १७८८ रोजी सेना धुरंधर मुधोजीराजे यांचे नागपूर येथे निधन झाले. त्यांचे नागपूरच्या राजघाटात समाधी मंदीर आहे.
टिप:नागपूरचे राजघाटाचा काही ठिकाणी, थडगेबाग असा उल्लेख केलेले काही आढळतो.