Live From The Field

मूळ प्रकाशन: Live From The Field - सुरपाखरू साहित्य

नागपूरचा इतिहास २२ जुलै २०२६

रथयात्रा

इ.स. १७३९ सेना साहेब सुभा रघुजीराजे यांना छत्रपती शाहु महाराजांनी लखनव मकसुदाबाद बिहार ढाका-बंगाल बितिया प्रयाग इल्लाहबाद हाजीपूर-पटणा या ८ प्रातांचा सरंजाम दिला.शाहु महाराजांनी या प्रांताचा सरंजाम देऊन तेथे स्वराज्याचा अमंल बसवून बंदोबस्त करण्याची रघुजीराजांना आज्ञा केली होती.वरील प्रांतांवर स्वराज्याचा अमंल बसविल्यास रघुजीराजांना या सरंजामाने त्या प्रांताची चैाथ २५ टक्के व १० टक्के सरदेशमुखी प्राप्त होणार होती.

नंतर इ.स.१७४२ मध्ये बिहार-बंगालचा नवाब अलिवर्दीखान याचे दिवान मीर हबिब याचे पत्र प्राप्त झाले. तेव्हा इंग्रज व्यापारी-तस्कारांनी बिहार-बंगालमध्ये अराज्यक माजविले होते. मोगल पातशहा फारूखसियार याचेकडून मोगलांच्या बंगाल सुभ्यात व्यापार करण्याचा परवाना प्राप्त करून हुगळी नदीच्या पुर्वकाठावरचे कासिम बाजार व कोलकता येथे वखारी उघडल्या होत्या व जानमालांचे सरंक्षणाचे निमीत्याने राजघराण्याचे बदुंकधारी फौजा आणून या वखारींवर ठेवले होत्या या फौजेच्या बळावर इंग्रज व्यापारी बंगाल बिहारच्या भाबडया शेतकरयांकडून चहा कापुस निळ आदी नगदी पिक कवडी मोल दरात प्राप्त करून त्यांची पिळवणू करीत होते. तसेच प्राप्त मालावरचा ४० टक्के निर्यात कर बुडवून इंग्रज व्यापारी मोठया प्रमाणावर तेथुन तस्करी करीत होते. इंग्रजांच्या या उद्योगात काही स्थानिक द्रव्यलोभी सहुकार-व्यापारी हि सामिल झाले होते अश्याप्रकारे बंगाल सुभ्यात अराज्यक माजले असल्याने दिवान मिर हबिब यानें रघुजीराजांची मदत मागितली होती.तेव्हा रघुजीराजांनी सेनापती भास्कराम कोल्हटकर यानां वीस हजार घोडदळसह बंगालचे मोहिमेवर पाठविले.

छत्तीसगढ घेतल्यानतंर सेनापती भास्कररामपंतानी यदुवंशीय राजा बिरकेसरी देव यांचा पराभव करून कटक प्रातांवर वर्चस्व स्थापले. नंतर सेनापती भास्कररामपंत सैन्यासह पंचकोट खिंडीच्या मार्गाने मोगलांच्या बिहार सुभ्यात दाखल झाले.दुसरे दिवशी सेनापती भास्करपंतांनी बिहार सुभा घेतला असता अलीवर्दीखान तेथून मुर्शिदाबादकडे निसटला. नंतर बंगाल सुभ्यात दाखल होऊन भास्कररामपंतानी कटवा येथे सैन्यासह पावसाळयाकरता तळ दिला. बंगाल प्रांती मराठे दाखल झाल्याचे कळल्यापासून कोलकताचे इंग्रज व्यापारी-तस्करांचे धाबे दणाणले.आपल्या वखारी भोवती खदंक खोदून सारे आत दडून बसले! त्यामूळे इंग्रजांच्या संरक्षणात राहून देशद्रोहि कारवाया करणारे स्वार्थी साहुकार व्यापारी हि भयभित झाले.

नंतर नवाब अलिवर्दीखानाने वकिल शेर उल्ला खान यास तहाचे बोलणी करता सेनापती भास्कररामपतांकडे पाठविल्याची बातमी कंपनीचे इंग्रजांना कळली. तेव्हा इंग्रज व्यापारयांनी कट रचला- द्रव्यलोभी माणिकचंद सेठ याचे मदतीने जानकिराम नामक इसमामार्फत नवाबाचे फौजदार मुस्तफाखान यास फितविले व त्याचे करवी पराक्रमी सेनापती भास्कररामपंत कोल्हटकर यांची ३१ मार्च इ.स. इ.स.१७४४ रोजी हत्या केली. या हल्ल्यात सुमारे विस मराठीवीर मारले गेले.सुदैवाने भास्कररामपतांची गर्भवती पत्नी जानकीबाई कटवाहून निसटून काशीकडे निघुन गेली .

कटवा हत्याकांडाची खबर ऐकून महाराज रघुजीराजे फार संतप्त झाले. त्यानी जोरदार आक्रमण करून बंगाल सुभ्यावर वर्चस्व केले. तेव्हा माघार घेऊन अलिवर्दीखानाने महाराज रघुजीराजे यांचेशी मुर्शिदाबाद येथे तह केला व तहात अलिवर्दीखानाने बंगाल-बिहार सुभांची दरसाल बारा लक्ष चैाथ दिली.नंतर महाराज रघुजीराजांनी संरक्षण देऊन मोगलांमूळे बंद पडलेली पुरीची रथयात्रा पुन्हा सुरू केली. पण मराठयांच्या स्वारीमूळे कंपनीच्या इंग्रजांवर प्राणांतीक संकट ओढविले होते. त्यामूळे इंग्रज लेखक जानकिरामचे बंधु गंगाराम याचे कवितेचा दाखला देऊन मराठीविरांना बारगिर असे संबोधत त्यांचा अपप्रचार करताना दिसतात.वास्तविक बंगाल-बिहारमध्ये बारामही वाहत्या नदया असतानाही इंग्रजांच्या कुनितीमूळे बंगाल-बिहार सुभात अन्न-धान्यांचा तुटवडा होऊन मानव निर्मित दुष्काळ पडला होता!